belgaum

सांगोल्या जवळ बेळगावचे पाच वारकरी अपघातात ठार

0
6968
Sangola accident
 belgaum

कार्तिकी एकादशी निमित्त बेळगावहुन पंढरपूरला जाणाऱ्या टाटा एस गाडी आणि ट्रॅक्टर मध्ये झालेल्या अपघातात बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावातील पाच वारकरी ठार झाले आहेत.शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे हा अपघात घडला आहे. या घटनेत चौघे जखमी असून दोघे गंभीर असून इतर जखमींवर सांगोला व पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत.

Sangola accident

मिळलेल्या माहितीनुसार बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावातील लोक खाजगी टेम्पो टाटा एस मधून कार्तिकी एकादशी निमित्त विठोबाच्या दर्शनासाठी जात होते वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली त्यात पाच जण जागीच ठार झाले आहेत.मयतात हंगरगा येथील एक तर मंडोळी येथील चौघे आहेत.या अपघातात टाटा एस गाडीचा चक्काचूर झाला आहे.

 belgaum

सध्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे या घटने नंतर बेळगावातील मंडोळी गावावर शोककळा पसरली आहे.मंडोळी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष गावकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.