उचगावचा जवान जम्मू मध्ये शहीद

0
 belgaum

जम्मू येथे दशहतवाद्यांशी लढताना बेळगाव तालुक्यातील उचगाव गावच्या सुपुत्रास वीरमरण प्राप्त झाले आहे.राहुल भैरू सुळगेकर वय 22 रा.मारुती गल्ली उचगाव असे हुतात्म्य पत्करलेल्या जवानाचे नाव आहे.

राहुल हा गेल्या चार वर्षांपूर्वी मराठा रेजिमेंट मधून सैन्यदलात भर्ती झाला होता सध्या 4 मराठा युनिट मध्ये सेवा बजावत होता गुरुवारी जम्मू पुंछ भागात पाकिस्तान सैन्याशी मुकाबला करताना त्याला वीर मरण प्राप्त झाले आहे.

bg
Rahul sulgekar
Rahul sulgekar martyr

त्याच्या पश्चात्य आई वडील भाऊ असा परिवार असून तो अविवाहित होता.त्याचे वडील भैरू सुळगेकर हे सैन्यदलात निवृत्त झालेत तर मोठा भाऊ मयूर सुळगेकर देखील सैन्य दलात सेवा बजावत आहे.

राहुलला वीरगती प्राप्त झाल्याची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांना दुःख अनावर झाले झाले असून उचगाव गावावर शोककळा पसरली आहे.शुक्रवारी रात्री त्याचे पार्थिव बेळगावला यायची शक्यता आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.