belgaum

रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू ओळख पटवण्याचे काम सुरू

0
Railway track
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील फर्स्ट गेट परिसरात आज सायंकाळी ६ च्या सुमारास रेल्वेखाली सापडून एका ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सायंकाळी सहाच्या सुमारास फर्स्ट गेट परिसरात एका व्यक्तीचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि टिळकवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस तपास सुरू
मयत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच, ही आत्महत्या आहे की रेल्वेतून पडून हा अपघात झाला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मृत व्यक्ती नक्की कुठली आहे किंवा घटनेचे नेमके कारण काय, याचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तपासासाठी रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.