केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
या तीन फोन कॉल्सनंतर पोलिसांनी नितीन गडकरींचं जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे.
हा फोन नेमका कुणी केला याचा तपास आता पोलीस करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्याची बातमी एबीपी माझाने दिली होती.
जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने नितीन गडकरींना धमकी देण्यात आली आहे.दरम्यान नितीन गडकरी यांना बेळगावच्या हिंडलगा कारागृहातून धमकीचा फोन आल्याची माहिती उघडकीस आली आहे.
त्याचबरोबर मंगळूर येथील एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपासा साठी नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना झाले आहेत.