टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डान पुलाच्या ठिकाणी क्रेनसह मोठ्या प्रमाणात बांधकामाचे साहित्य आणले जात असल्यामुळे लवकरच या पूलाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या रेल्वे गेट येथील रस्ता उड्डाण पूलाचा (आरओबी) पायाभरणी समारंभ 6 जानेवारी रोजी तत्कालीन खासदार सुरेश अंगडी यांच्या हस्ते झाला होता. तिसऱ्या रेल्वे गेटला लेव्हल क्रॉसिंग नं. 381 म्हणून ओळखले जाते. सदर उड्डाण पुलावरील एक बाजू ऑक्टोबर 2022 मध्ये जनतेला वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
आता या पुलाच्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य येऊन पडण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तिसरे गेट उड्डाण पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या दुपदरी रस्त्याच्या बांधकामाला केंव्हाही प्रारंभ होऊ शकतो. सदर प्रकल्पाचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
आरओबीसाठी खर्च : रु. 27.28 कोटी (दोन्ही भागांसह), आरओबीचा कालावधी : 1 x 2 x 54 बाऊस्ट्रिंग गिर्डर, अप्रोचीस : पणजी बाजू -(5+6) x 18 मी. पीएससी (250 मी.) बेळगाव बाजू -(7+6) x 18 मी. पीएससी (331 मी.),
कंत्राटदार : मेसर्स कृषी इन्फ्राटेक. रेल्वे मंत्रालय आणि कर्नाटक सरकार यांच्यात 50:50 खर्च विभागणी आधारावर या रस्ता उड्डाण पुलासाठी (आरओबी) 27.28 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.