बेळगाव लाईव्ह : दहावी परीक्षेला ३१ मार्च पासून सुरुवात होत असून . या दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निःशुल्क सेवा द्यावी, अशी विनंती माध्यमिक शिक्षण सचिवांनी परिवहन महामंडळाकडे केली होती.
त्याची दखल घेत परिवहन महामंडळाने दहावी पुरवणी परीक्षेला हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
परिवहनच्या या निर्णयामुळे दहावी पुरवणी परीक्षेला हजर राहणारे विद्यार्थी परीक्षा काळात परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास करू शकणार आहेत.
दहावी परीक्षेचे प्रवेश पत्र व जुने बसपास दाखवून विद्यार्थी प्रवास करू शकतील. सदर परीक्षा १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत आणि परीक्षा केंद्रापासून घरापर्यंत विद्यार्थी आपले परीक्षा प्रवेश पत्र दाख बसमधून निःशुल्क प्रवास करू शकतात.