होळीच्या पाचव्या दिवशी बेळगावात रंगपंचमी निमित्त उत्साहांचे वातवरण होते बेळगाव शहरातील दक्षिण भागासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी रंग पंचमी उत्साह शिगेला पोहोचला आहेअनेक जणांनी शेतात पार्टीचा बेत आखला आहे.
शहरात विशेषतः वडगाव शहापूर भागात डॉल्बीचे ठेक्यावर थिरकणारी तरुणाई ,गल्लोगल्लीत लावण्यात आलेले पाण्याचे कारंजे, उंचावरून पडणाऱ्या पाण्यात रंग उधळणारे, आनंद लुटणारे अवालबुद्ध लक्ष, वेधून घेणारा महिलांचा सहभाग, सप्तरंगात चिंब भिजत बेभान होऊन नृत्य करणारे युवक अशा वातावरणात रंग पंचमी पार पडली .
रविवारी शहापूर, वडगाव,खासबाग आणि येळ्ळूर आदी ग्रामीण भागात रंगपंचमी जल्लोषात साजरी करण्यात आली.संस्थान काळापासून शहापूर वडगाव सह ग्रामीण भागात होळीच्या पाचव्या दिवशी पारंपारिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केले जाते. बेळगाव शहर उपनगरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी होत असली तरीही ग्रामीण भागात मात्र आजही पारंपारिक पद्धतीने रंगोत्सवाचे आयोजन केले जाते.
रविवारी सकाळपासून शहापूर, वडगाव, खासबाग आणि ग्रामीण भागात रंगोत्सव सुरू झाला. अबालवृद्ध एकमेकांवर रंगांची उधळ करताना दिसत होते. यात मुले तरुणांचा सहभाग मोठा होता. विविध गल्लीत रंग खेळण्यासाठी शॉवरची सोय करण्यात आली होती.
काहीजण गल्लीत एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करत होते.अनेक ठिकाणी डॉल्बीच्या तालावर ठेका धरत तरुणाईने रंगांची मुक्त उधळण करत सोबत चिंब भिजण्याचा आनंद लुटला.