बेळगाव लाईव्ह : काँग्रेस नेते राहुल गांधी हे येत्या २० मार्च रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या संदर्भात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेळगाव विभागातील पक्षश्रेष्ठींची प्राथमिक बैठक गुरुवार दि. १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात बोलावण्यात आली आहे.
चिक्कोडी, बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, हुबळी शहर, धारवाड ग्रामीण, बागलकोट, विजापूर, गदग आणि हावेरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार, माजी खासदार, माजी मंत्री, माजी आमदार,
२०१९ सालचे लोकसभा उमेदवार, २०१८ चे विधानसभा उमेदवार, केपीसीसी पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
२०२३ च्या विधानसभा निवडणुक इच्छुकांनी तसेच आघाडीच्या युनिट्स जिल्हाध्यक्षांनी, विभाग आणि सेलच्या जिल्हाध्यक्षांनी बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.