बेळगाव लाईव्ह : १९ मार्च रोजी येळ्ळूर राजहंसगडावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या सोहळ्याची रूपरेषा ठरविण्यासाठी आज या सोहळ्याच्या कमिटीच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी अनेक सूचनाही मांडल्या असून या सूचनांचा विचार करून कार्यक्रमाची पुढील रूपरेषा ठरविण्यात आली.
१९ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत अभिषेक व दुग्धाभिषेक होणार असून तत्पूर्वी मंगलवाद्य, सनई चौघड्यांच्या सुरात भव्य पालखी सोहळा होणार आहे.
अभिषेक व दुग्धाभिषेक विधीचे पौरोहित्य रायगड येथील के. एन. पाटील गुरुजी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यानंतर गडाच्या पायथ्याशी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच शाहीर शिवाजी देवगेकर आणि सहकाऱ्यांचा पोवाडा कार्यक्रम, ढोलताशा वादन, लाठीमेळ्याची प्रात्यक्षिके, सजीव देखावे, शिवराज्याभिषेक सोहळा, लेझर शो यासारख्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
आकर्षक विद्युत रोषणाई आणि लेझर शोच्या माध्यमातून गडाला आकर्षक असे स्वरूप देण्यात येणार असून या सोहळ्यास समस्त शिवप्रेमी आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
WHY you are wasting milk,, utilise this milk for poor people kids.
& Why Brahmin is required for Milk wastage.