पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सोमवारी दुपारी बेळगावमध्ये आगमन होणार असून विशेष म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी विभिन्न उद्योगातील सहा कुशल कामगारांची निवड करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मीनाक्षी तलवार, कृषी खात्याच्याशेतकरी शीला खन्नूकर, विणकर कल्लाप्पा तंबगी, ऑटोचालक मयूर चव्हाण, हॉटेल वेटर चंद्रकांत होनकर आणि बांधकाम कामगार मंगेश बस्तवाडकर अशी या निवडक कामगारांची नावे आहेत. हे सहा जण पंतप्रधानांचे सहर्ष स्वागत करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी एक 45 वाजण्याच्या सुमारास सांबरा विमानतळावर आगमन होणे अपेक्षित असून तेथून ते हेलिकॉप्टरने एपीएमसी येथील के एस आर पी मैदानाकडे रवाना होतील.
तेथून ते राणी चन्नम्मा सर्कल येथे 10.45 कि. मी. अंतराच्या मालिनी सिटी येथे समाप्त होणाऱ्या रोड शोसाठी येतील. रोड शो चा संपूर्ण मार्ग भगवे ध्वज फडकविण्यासह आकर्षक रित्या सजविण्यात आला असून या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.