पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राज्यात जातात तेथे त्या ठिकाणच्या स्थानिक भाषेत ते आपल्या भाषणाची सुरुवात करतात.
तेंव्हा आजच्या बेळगावातील आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीतून करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटद्वारे व्यक्त केली आहे.
मोदीजी ज्या राज्यात जातात, तेथे स्थानिक भाषेत भाषणाला सुरुवात करतात. आज मराठी भाषा गौरव दिन, पंतप्रधान बेळगावात आहेत. बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मराठी जनांना अभिमान वाटेल!
कर्नाटक सरकारला एक कडक संदेश जाईल. पहा जमते का! असे ट्विट मुंबईचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. खासदार राऊत यांनी आजच्या मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या ट्विटचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
मोदीजी ज्या राज्यात जातात तिथे स्थानिक भाषेत भाषणाला सुरूवात करतात. आज मराठी भाषा गौरव दिनी, पंतप्रधान बेळगावात आहेत. बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मराठी जनांना अभिमान वाटेल ! कर्नाटक सरकारला एक कडक संदेश जाईल.पहा जमतंय का!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 27, 2023