देश पातळीवर बेळगावच्या निवडणुका कडे साऱ्या देशाच लक्ष असते त्यांना स्वच्छ मनानी सांगा आणि सगळे एक होऊन जास्तीत जास्त आमदार निवडून आणा मग तुम्हा सगळ्यांना सन्मानाने जगण्याची वेळ आणल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही अशी खात्री देतो असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
तब्बल ३२ वर्षांनी बेळगाव येथील सी पी एड मैदानावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एन डी पाटील होते.व्यासपीठावर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, माजीमंत्री इस्लामपूर चे आमदार जयंत पाटील, माजी खासदार नवेदिता माने, कॉम्रेड कृष्णा मेणसे,किरण ठाकूर, धैर्यशील माने, उपमहापौर मधुश्री पुजारी आदी उपस्थित होते.
यावेळी सीमा लढ्यात विशेष योगदान दिलेल्या तिघांचा सत्कार यावेळी मेळाव्यात करण्यात आला त्यामध्ये जेष्ठ नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे,कॉम्रेड वकील राम आपटे,वकील किसनराव येळ्ळूरकर यांचा समावेश आहे. या शिवाय शरद पवारांचा सीमा लढ्यातील योगदाना बद्दल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महा पालिकेच्या वतीने मानचिन्ह विशेष सत्कार करण्यात आला.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने एकीकरण समितीच्या दोन्ही गटातील नेते सी पी एड मैदानावर हजर होते. आगामी निवडणुकीत समिती नेत्यात एकी झाल्यास एकास एक उमेदवार असल्याच मराठी जागा निवडून येतील यासाठी महाराष्ट्रातील प्रयेक नेत्याने एकी करा अधिक जागा निवडून आणा असे आवाहन केल.
बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टात सर्व ताकतीनिशी आम्ही लढत आहे सीमा प्रश्न देश पातळीवर खऱ्या अर्थाने पोचवायचा असेल तर लक्ष वेधायचे असेल तर वकिलांची खटल्याची बाजू बळकट करायची गरज आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने जास्तीत जास्त संख्येने आमदार निवडून द्यावेत त्यामुळेचे कोर्टाची बाजू भक्कम झाल्या शिवाय राहणार नाही यासाठी मराठी जनतेची साथ हवी असे आवाहन देखील शरद पवार यांनी केल.
एकीकरण समितीने महापौर उपमहापौर निवडून दिले, एका दिलाने निवडणुकात काम करता कुणी इकडे गेला तिकडे गेला तुकडे दुर्लक्ष करत त्याच बरोबर मराठी भाषिकांच्या हिताची जपणूक तुम्ही केली आहे. देशाच्या नेतृत्व मी करत असतो त्यावेळी सुसंवाद ठेवत असतो आता पर्यंत महाराष्ट्राच्या जनतेने देशाच्या विधी मंडळ लोकसभा राज्य सभेत मी ५० वर्ष काम करत आलोय त्यांच्या सगळ्यांची भावना सीमा प्रश्न सुटावा हीच आहे . सीमा प्रश्न बेळगाव पुरता करत मर्यादित ननाही तर मी बिदर भालाकीचा देखील विचार करतो. आगामी निवडणुकाहा या सगळ्याचा शेवटचा टप्पा आहे मतभेद गाडून एका विचाराने जावा असा सल्लाही त्यांनी दिला.
देश पातळीवर बेळगावकडे सगळ्या साऱ्या देशाच लक्ष असते ज्याचं लक्ष असत्यत त्यांना स्वच्छ मनानी सांगा आणि सगळे एका होऊन आमदार निवडून आणू तुम्हा सगळ्यांना सन्मानाने जगण्याची वेळ आणतो स्वस्थ बसणार नाही अशी खात्री देतो असेही ते म्हणाले .
गेली ६२ वर्ष अनेकांनी हुतात्म्य केलं बलिदान दिल त्यांना आदरांजली वाहत त्यांना नतमस्तक होण्यासाठी मी बेळगावला आलोय असे म्हणत त्यांनी तुम्ही देश पातळीवरचे नेते आहात बेळगावला का जाताय असा प्रश्न मला अनेकांनी विचारला तेंव्हा मी कोणत्याही भाषेशी वैर करत नाही देशातील बंगाली पंजाबी गुजराती मी जसा आदर करतो तशी बाकीच्या नेत्यांनी मराठी बाबत भूमिका स्वीकारावी अशी मजाही भावना आहे हे माझ सूत्र स्वीकाराव अस देखील आवाहन त्यांनी बेळगावात मराठीचा द्वेष करणार्यांना केली. कर्नाटक हा देखी माझा भाऊ आहे शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती तेंव्हा इतर माझे बांधव आहेत हीच भावना ठेवली होती. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा कमी पाणीअसताना देखील कोयनेच पाणी कर्नाटकला दिल होत शेजार धर्म पाळला होता यांचीही त्यांनी आठवण करून दिली.
१९६२ साली एकीकरण समितीचे सात, १९६७ साली पाच तर आज केवळ दोन आमदार निवडून आलेत सुप्रीम कोटातील याचिकेसाठी बळकटी मिळण्यासाठी समितीचे अधिकाधिक आमदार निवडून येणे गरजेचे आहे अस देखील त्यांनी स्पष्ट केल.
पवारांनी हरीश साळवे यांच्या सारखे निष्णात वकील देऊन कोर्टाच्या कामकाजात बळकटी दिली आहे अंतिम टप्प्यात असलेल्या सीमा प्रश्नांच्या कामकाजात न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी वाटचाल सुरु आहे सर्व सामुग्री तयार आहे समस्त सीमा भाग पवारांच्या योगदानान बद्दल कायम ऋणी असेल असे मत जेष्ठ नेते एन डी पाटील यांनी अध्यक्ष स्थानावरून मांडले.
सीमा भागातील मराठी जनतेने गेली ६२ वर्ष हा लढा जिवंत ठेवला असून जखमा बल्बालात आहेत त्या वाळल्या नाहीत ब्रिटीश आणि मोगला पेक्षाही वाईट वागणूक बेळगावातील मराठी जनतेला मिळते याची आम्हाला जाणीव आहे असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले. यावेळी धैर्यशील माने आणि माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी देखील विचार मांडले. मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी प्रास्तविक केले तर कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी स्वागत केले मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी आभार मानले. विशेष अटी घालून मेळाव्यास परवानगी देण्यात आली होती सी पी एड मैदानावार कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मेळाव्यास खानापूर बेळगाव सह बिदर भालाकीहून देखील समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
–
मराठीवर अन्याय का कशासाठी कोण शिकवत दुसऱ्याचा द्वेष करायला महाराष्ट्र देश एकसंघ ठेवण्यासाठी कायम संघर्ष त्याग बलिदान दिलेले आहे विचारांच्या कक्षा मोठ्या करुन भारत मातेच्या उद्धारासाठी सर्व जण एक होउन काम केल पाहिजे
Belgavacha Tamam Jantene Yethya Nivadnukit ekatch Samitinista Umedawar Nivdun Denyachi Garaj Ahe.# Gaddarana Thynchi jaga Dakhava.