बेकायदेशीर रित्या हरणाची शिंगे साठवलेल्या पाच जणांच्या टोळीस शहर गुन्हा पोलिसांनी धाड टाकून अटक केली असल्याची माहिती पोलीस डी सी राजप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली.बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील बाळू बीजगरणी यांच्या शेतात धाड टाकून शिंगे जप्त केली असून पाच जणांना अटक देखील केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 किलो 250 ग्रॅम वजनाची हरणाची शिंगे जप्त केली आहेत नागेश मदार 23 रा.मणतुर्ग तालुका खानापूर,रामचंद्र दळवी 26 मणतुर्ग, रवींद्र बिष्ठप कोलकार वय 27 हडलगा,परशराम निलजकर 20 चापगाव, अमन महादेव कणबर्गी वय 23 रा चापगाव यांना अटक करण्यात आली आहे.पत्रकार परिषदेत डी सी पी सीमा लाटकर, महानिंग नंदगावी आदी उपस्थित होते.