belgaum

अमीर खानच्या कार्यालयासमोर बेळगावच्या तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न

0
2150
 belgaum

मंगळवारी संध्याकाळी अभिनेता अमीर खान यांच्या मुंबईतील कार्यालयासमोर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता.एका 33 वर्षीय तरुणाने अमीर खानच्या कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला होता.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाला अमीर खानला भेटायचे होते पण सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाला भेटायला दिले नाही.आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद कासीम असून तो कर्नाटकातील बेळगावचा रहिवासी आहे.

 

 belgaum

अमीर खानच्या सुरक्षा रक्षकांनी मोहम्मद कासीमला पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मोहम्मदला अमीर खानची भेट घेऊन महाराष्ट्रात सुरु असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कार्याबाबत चर्चा करून काही तोडगे सुचवायचे होते.यासाठी त्याने मंगळवारी अमिरचे कार्यालय गाठले.

तेथील सुरक्षा रक्षकांनी त्याला भेटायला मज्जाव करताच त्याने खिशातून विषाची बाटली काढून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्याला पोलिसांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल करून बेळगावहून त्याच्या घरच्यांना बोलवून घेऊन त्यांच्या ताब्यात त्याला दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.