कॅन्टोन्मेंट येथील भाजी मार्केट एपीएमसीत हलवण्याचा आदेश देण्यात आल्यानंतर बैठक झाली आणि मंगळवारी कोणत्याही पद्धतीने आम्ही नवीन भाजी मार्केट चालवणारच असा इशारा एपीएमसीने दिला.
कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट चालू देणार नाही असा इशाराही बैठकीद्वारे देण्यात आला यावर भाजी मार्केटमधील व्यापारी भडकले...
बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचे जारकीहोळी बंधू सतत राज्य राजकारणात चर्चेत राहतात, सध्या काँग्रेस मधील रिबेल स्टार रमेश जारकीहोळी यांना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तातडीने बेंगळूरला बोलावले असून ते रवाना झाले आहेत, तर दुसरीकडे वनमंत्री असलेले सतीश जारकीहोळी हे ऑपरेशन हात...
वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, सामाजिक कार्यकर्ते किरण निपाणीकर आणि काही उद्योजक संस्थांनी मिळून एका ठिकाणी अडचण ठरणारी झाडे मुळातून उखडून पुनररोपित करण्याचा अभिनव उपक्रम आजपासून सुरू केला आहे. झाडे तोडण्यापेक्षा पुन्हा जगवण्याचा हा बेळगावातला पहिला उपक्रम आहे.
किरण निपाणीकर यांच्या...
'काळी आई जाईल म्हणून जीवाला लागला घोर' अशी अवस्था रयत गल्लीतील युवा शेतकरी तानाजी हलगेकर याची झाली आहे, त्याने मानसिक धक्का लावून घेतला असून तो अस्वस्थ झाल्याने आता त्याच्यावर उपचार करण्याची वेळ आली आहे.
शासनाने व महामार्ग प्राधिकारण खात्याने कोणतीही...
कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट सोडून आम्ही एपीएमसीत जाणार नाही आणि कसलीही दादागिरी आमच्यावर चालणार नाही असा इशारा भाजीपाला व्यापारी, दलाल आणि शेतकऱ्यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिला आहे. भव्य हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून हा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी आर विशाल यांना...
मातृदिनाचे औचित्य साधून माननीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बेळगाव जिल्हा इस्पितळाच्या प्रसूती विभागातील परिचरिकांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शहर प्रमुख रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रसूती विभागातील परिचारिकांच्या सेवेचे ऋण...