Tuesday, December 24, 2024

/

बोगद्यातून कामगारांची सुटका; बेळगावच्या अभियंत्याची प्रतिक्रिया

 belgaum

बेळगाव लाईव्ह:आम्ही बेळगाव कर्नाटकातून आलो आहोत. आमच्या कंपनीने येथील बचाव कार्यात सहकार्य करण्यासाठी आम्हाला येथे धाडले. आम्ही येथे आल्यानंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत इंडॉस्कॉपीक कॅमेरा सोडला.

त्यांना सुरक्षित पाहून सर्व देशवासीयांना विशेष करून त्या कामगारांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. आनंद झाला, असे सिल्क्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांशी संपर्क साधण्यास मदत करणाऱ्या इंडॉस्कॉपी कॅमेऱ्याचे ऑपरेटर भालचंद्र किल्लारी म्हणाले.

उत्तरकाशी उत्तराखंड येथील सिल्क्यारा येथे बोगद्याचे बांधकाम कोसळल्याने मोठ्या ढिगार्‍याखाली 41 मजूर आत अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी मागील 17 दिवसापासून हरप्रकारे प्रयत्न केले जात होते. शर्थीच्या प्रयत्नांती बचाव पथकाकडून काल मंगळवारी बोगद्यात कोंडले गेलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली.

यावेळी सिल्क्यारा येथे भालचंद्र प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. सिल्क्यारा येथे बोगदा कोसळल्यानंतर बेळगावच्या एल अँड टी कंपनीच्या अभियंत्यांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते. भालचंद्र किल्लारी आणि दौदीप खंड्रा या दोघा अभियंत्यांना त्यावेळी म्हणजे गेल्या 20 नोव्हेंबर रोजी आपल्याकडील रोबोटिक इंडॉस्कॉपी कॅमेऱ्याद्वारे बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांचे लाईव्ह फुटेज मिळवण्यात यशस्वी झाले होते.

त्यामुळे बचाव कार्यात मोठी मदत झाली होती. गेल्या अडीच वर्षापासून भालचंद्र किल्लारी आणि दौदीप खंड्रा हे अभियंते बेळगावमध्ये एल अँड टी कंपनीकडे कार्यरत आहेत.

 

https://x.com/PTI_News/status/1729555846357803053?s=20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.