Tuesday, May 7, 2024

/

टिळकवाडी पोलीस निरीक्षक विरोधात राज्यपालांकडे तक्रार : मनपात ठराव

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील संघर्ष कमी झाला की काय असे असताना बुधवारी झालेल्या मनपा बैठकी नंतर पुन्हा एकदा सत्ता संघर्ष गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. महापालिकेत सुरू असलेले राजकारण पुन्हा एकदा रंगात आले असून आगामी दिवसात हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी झालेल्या मनपा बैठकीत सत्ताधारी भाजपने नगरसेवक अभिजित जवळकर यांना अटक केलेले पोलीस निरीक्षक निरीक्षकाविरोधात राज्यपालाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.याआधी बेळगाव महापालिका सत्ताधारी गटाच्या अजेंड्यावर मनपा आयुक्त होते आता टिळकवाडी पोलीस निरीक्षक आहेत अशी चर्चा मनपा वर्तुळात रंगत होती.

नगरसेवक जवळकर यांना करण्यात आलेली अटक बेकादेशीर आहे. त्यामुळे त्यांच्यावरही बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या टिळकवाडी पोलिस निरीक्षकाविरोधात राज्यपाल, राज्याचे गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि मानव हक्क आयोगाकडे तक्रार करण्याचा ठराव महापालिकेत संमत करण्यात आला.

 belgaum

काल जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी भाजप नेत्यांच्या समाचार घेताना वैयक्तिक मारमारीला भाजप विरुद्ध काँग्रेस असा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता त्यानंतर आज झालेल्या मनपा बैठकीत पोलीस निरीक्षक धारेवर धरण्यात आले

महापालिका सभागृहात बुधवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर शोभा सोमाणाचे अध्यक्षस्थानी होत्या.नगरसेवक जवळकर यांच्या हल्ल्याप्रकरणी नगरसेविका वाणी जोशी यांनी निषेधाचा ठराव मांडला. नगरसेविका वीणा विजापुरे, सारिका पाटील यांनी नगरसेवक अशा बाबतीत अशा प्रकार घडत असल्यामुळे आम्हाला संरक्षण पुरवावे, अशी मागणी केली.City corporation

घडलेल्या प्रकारावर प्रकाश टाकताना नगरसेवक जवळकर यांनी, 23 नोव्हेंबर रोजी आपण महापालिका अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार देशाला टॉवर उभारणीच्या ठिकाणी गेलो होतो. तिथून परतुन येत असताना माझ्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर मी रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांकडून माझ्यावर सातत्याने दबाव घालण्यात येत होता. जबानी बदलण्यास सांगण्यात येत होते. रुग्णालयाचा उपचार घेत असतानाच मला अटक करून हनुमान नगर परिसरात फिरवण्यात आले, त्यानंतर कारागृहात देण्यात आले. त्यामुळे या प्रकारची चौकशी करण्यात यावी. घटनेबाबत खरे खोटे करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि माझी ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केली.
यावेळी आमदार राजू सेठ यांनी, नगरसेवकावर झालेला हल्ला चुकीचा आहे. तसे कोणीही समर्थन करू शकत नाही. पण या साऱ्या प्रकाराचे चौकशी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे, असे सांगितले.
सभागृहात सुमारे दीड तास झालेल्या चर्चेनंतर पोलीस निरीक्षकाविरोधात राज्यपाल राज्याचे गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री आणि मानव हक्क आयोगाकडे तक्रार करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

महापौरांचा अपमान
महापौरांनी पोलीस आयुक्तालया समोर जाऊन करणे हा त्यांचा अपमान आहे. पोलीस अधिकारी असो वा कोणीही वरिष्ठ अधिकारी असो त्यांना आपल्या कक्षात बोलावून घेणे अपेक्षित होते. त्यामुळे महापौरांनी यापुढे याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार राजू सेठ यांनी केली. तर महापौर शोभा सोमनाचे यांनी, आपण वेळ घेऊनही पोलीस आयुक्तांनी कार्यालयात घेतले नाही, त्यामुळे आपल्याला आंदोलन करावे लागले, असे सांगितले. महापौरांचा अपमान हा संपूर्ण शहराचा अपमान आहे, त्यामुळे यापुढे अशा प्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात आली अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.