Thursday, December 26, 2024

/

‘त्या’ जळीतग्रस्तांना हनबर समाजाचा मदतीचा हात

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बसवण कुडची येथे आगीच्या दुर्घटनेत घरे जळून खाक झाल्यामुळे उघड्यावर पडलेल्या दोन जळीतग्रस्त कुटुंबीयांना बेळगाव जिल्हा हनबर समाजाच्यावतीने जीवनावश्यक साहित्यसह आर्थिक मदत करण्यात आली.

बसवण कुडची येथील अभिषेक अनंत कौलगी व सविता बिरनोळी यांच्या घराला आग लागून दोन्ही घरे जळून खाक झाली होती. आगीच्या दुर्घटनेत घरातील जीवनावश्यक साहित्य, 4 बकरी, 5.5 तोळे सोने आणि 4.5 लाखाची रोख रक्कम जळून सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले होते.Kudachi

त्यांचा संसार उघड्यावर पडला होता. याची दखल घेत बेळगाव जिल्हा हनबर समाजाने जळीतग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देताना त्यांना जीवनावश्यक वस्तू तसेच पैसे देऊ केले.

याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष शीतल मुंडे, वाय. वाय. गडकरी, डॉ. मल्लाप्पा हंम्मनावर, एन. एन. पाटील, नगरसेवक बसवराज मोदगेकर, राजू हम्मनावर, एम. आर. मगदूम, व्ही. एम. पाटील, रामा पाटील, बसवंत कौलगी आदी उपस्थित होते. राजू बल्लनावर यांनी यावेळी त्या कुटुंबांना 5 हजाराची उस्फुर्त मदत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.