वीट भट्टीवर काम करताना अंगावर वीज कोसळल्यामुळे एका महिला कामगाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बिडी गावामध्ये घडली.
वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नांव लक्ष्मी मादर (वय 35) असे आहे. लक्ष्मी ही बिडी येथील विटाच्या भट्टीवर कामाला होती.
काल भट्टीवर काम करत असताना अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे विटांवर प्लास्टिक झाकत असताना लक्ष्मीवर वीज कोसळली.
विजेचा लोळ अंगावर कोसळताच ती जागीच गतप्राण झाली. सदर घटनेची खानापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.