Friday, May 3, 2024

/

रामदुर्ग येथे 1.54 कोटी रुपयांची रोकड जप्त

 belgaum

कार गाडीतून बेळगावला नेण्यात येत असलेली 1 कोटी 54 हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केल्याची घटना आज सकाळी रामदुर्ग (जि. बेळगाव) येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार रामदुर्ग येथे आज गुरुवारी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून एक कार गाडी अडवून तिची झडती घेतली. त्यावेळी कारमध्ये सापडलेल्या एका सुटकेसमध्ये 1 कोटी 54 हजार रुपयांची रोकड निदर्शनास आली.

चौकशीत त्या रोख रकमेबाबत योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे तसेच रकमे संदर्भातील आवश्यक कागदपत्रेही नसल्यामुळे ती रक्कम रामदुर्ग पोलिसांनी जप्त केली असून प्रकरण संबंधित खात्याकडे वर्ग केले आहे.

 belgaum

जप्त करण्यात आलेली रोकड बेळगावला नेण्यात येत होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.