22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 27, 2023

आमचं ठरलंय….!

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये जरी विधानसभा निवडणुकीचे वातावरण चुरशीने तयार होत असले तरी सध्या बेळगावच्या राजकारणात महाराष्ट्र एकीकरण समितीचीच हवा आहे. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा श्वास रोखून ठेवणारे प्रचार आणि मराठी भाषिकांचा दिवसागणिक वाढत चाललेला पाठिंबा, न विकता आणि न...

म. ए. समिती उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार तालुका समिती युवा आघाडीची बैठक

म. ए. समितीने ग्रामीण मतदारसंघात नव्या चेहर्‍याला संधी दिली असल्यामुळे आणि गेल्या पंधरा वर्षांपासून मराठी भाषिक हक्काच्या आमदारापासून वंचित असल्यामुळे यावेळी समितीच्या विजयासाठी अधिक प्रयत्न करण्याचा आणि प्रचार यंत्रणा आक्रमक राबवण्याचा निर्धार तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्या बैठकीत...

ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा धडाका

बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांचा शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रचाराचा धडाका आता वाढला असून ठीकठिकाणी ॲड. येळ्ळूरकर यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलावर्ग आणि युवकांचा सहभाग दिसून येत आहे. समितीचे उमेदवार ॲड....

‘दक्षिण’च्या प्रचारात संचारला रोमांचकारी उत्साह!

बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण सीमाभागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समितीमय वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांचा वाढता ओढा आणि ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ निघणाऱ्या प्रचार फेऱ्या, जाहीर सभा यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग अंगावर शहारे उभं करणारा ठरत आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे म. ए....

शिवराय, डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीनुसार आगेकूच -कोंडुसकर

गर्व आलेल्यांचे गर्वहरण करण्याची ही वेळ आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ताकदीचा वापर न करता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'शिका, संघर्ष करा आणि हक्क मिळवा' या शिकवणीप्रमाणे वागणे काळाची गरज आहे. कोणालाही न घाबरता छ. शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर...

बेळगावच्या 39.47 लाखांसह राज्यात 5.30 कोटी मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून राज्यातील 5 कोटी 30 लाख 85 हजार 566 सामान्य मतदारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये 2,66,82,156 पुरुष, 2,73,98,483 महिला आणि 4927 इतर मतदार आहेत. त्याचप्रमाणे यातील बेळगाव जिल्ह्याची एकूण मतदार संख्या...

बेळगावात आम. रोहित पवार यांची तोफ धडाडणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत -जामखेड (महाराष्ट्र) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची तोफ बेळगावमध्ये धडाडणार आहे. आमदार होण्याबरोबरच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले रोहित पवार आता क्रिकेट मैदानाऐवजी बेळगावच्या निवडणूक मैदानात उडी घेऊन म. ए. समितीच्या उमेदवारांसाठी प्रचार...

निवडणुकीनंतर सुरू होणार कणबर्गी योजना

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुढील आठ दिवसात कणबर्गी निवासी योजनेचे काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही बेळगाव शहर विकास प्राधिकरण बुडा प्रशासनाने शेतकऱ्यांना दिली आहे. कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी काल बुधवारी बुडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. त्यावर...

विमान फेऱ्यांमध्ये कपात तरीही प्रवासी संख्येत 12 टक्के वाढ

देशातील विमानतळांच्या प्रवासी संख्येची आकडेवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) नुकतीच जाहीर केली असून त्यानुसार बेळगाव विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत मागील महिन्यांच्या तुलनेत गेल्या मार्चमध्ये 12.17 टक्के वाढ झाली आहे. बेळगावची विमानसेवा एकीकडे कमी होत असतानाही प्रवाशांचा प्रतिसाद मात्र उत्तम मिळत आहे....
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !