शतकोत्तर परंपरा लाभलेल्या बेळगावच्या श्री शिवजयंती निमित्त मध्यवर्तीय सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने उद्या शनिवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी शिवज्योतीचे स्वागत आणि शिवरायांच्या मूर्ती पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शतकोत्तर परंपरा लाभलेल्या श्री शिवजयंती निमीत्त बेळगाव शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने उद्या शनिवार 22 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता धर्मवीर संभाजीचौकात विविध गडावरून येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे.
त्यानंतर ठीक 10 वाजता छ. शिवाजी उद्यान शहापूर येथे शिवछत्रपतींच्या सिंहासनारूढ मूर्तीची विधिवत पूजा होणार आहे. तसेच गल्लोगल्ली शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी केली जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणूक ही येत्या 27 मे रोजी काढण्यात येणार आहे, अशी माहिती मध्यवर्तीचे अध्यक्ष दिपक दळवी आणि सरचिटणीस मदन बामणे यांनी दिली आहे.
Naic