मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 11 तारखेपर्यंत मुदत आहे असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.एप्रिल 11 पर्यंत मतदार यादीत नावे समाविष्ट मुभा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करण्याचा 20 एप्रिल हा शेवटचा दिवस आहे.नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल (NVSP) वर लॉग इन करून जनतेने नाव नोंदणी करू शकतात किंवा मतदार यादीत त्यांचे नाव असल्याची खात्री करू शकतात.
याशिवाय पात्र मतदार फॉर्म-6 भरून व्होटर हेल्प लाइन अॅपद्वारेही आपली नावे नोंदवू शकतात, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
नाव समाविष्ट करण्यासाठी टीप:
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जनतेने आपली नावे मतदार यादीत असल्याची खात्री करावी.
नाव नसल्यास एप्रिल 11 पर्यंत नाव जोडण्याची संधी असेल असे सांगण्यात आले.
या संधीचा जनतेने उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.