बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. यानुसार २९ मार्च ते १५ मे या कालावधीत निवडणूक प्रचारासाठी किंवा कोणत्याही राजकीय वापरासाठी मंदिर, मस्जिद,
चर्च आणि इतर धार्मिक स्थळांवर निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या सभा, बैठका, प्रचार, कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही कारणासाठी राजकारण्यांनी कार्यक्रम घेणे निषिद्ध असून या नियमाचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
संहिता लागू झाल्यानंतर आता 13 एप्रिल पासून निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून मुख्यतः प्रकाराच्या काळात इच्छुक उमेदवारांनी धार्मिक स्थळाचा वापर निवडणुकीसाठी करू नये असाही आदेश बजावण्यात आला आहे.