Thursday, May 2, 2024

/

मध्य. सार्व. शिवजयंती उत्सव मंडळांची रविवार बैठक

 belgaum

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक रविवार दि. 9 रोजी बोलाविण्यात आली आहे. रामलिंगखिड गल्ली येथील जत्तीमठ येथे सायंकाळी 5 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शहर व उपनगरातील सर्व मंडळाचे पदाधिकारी व शिवभक्तानी उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.

रविवारी शिवजयंती चित्ररथ महामंडळाची बैठक

शहर व उपनगरात शिवजयंती साजरी करण्याबाबत तसेच शिवजयंती चित्ररथ मिरवणूक संदर्भात कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे रविवार दि. 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता शिवजयंती उत्सव नियोजन बैठक आयोजित केली आहे.

 belgaum

शहरातील धर्मवीर संभाजीराजे चौकातील दुर्गादेवी मंदिर जत्तीमठ येथे रविवारी सकाळी 10 वाजता ही बैठक सुरू होईल. बैठकीला शहर व उपनगरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनिल जाधव व सरचिटणीस जे. बी. शहापुरकर, उपाध्यक्ष मेघन लंघरकांडे, राहुल जाधव, रवी निर्मळकर, संतोष कणेरी, जनसंपर्क प्रमुख प्रसाद मोरे, आदित्य पाटील, ओमकार पजारी आणि विनायक बावडेकर यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.