belgaum

कोंबडी फार्मच्या NOC साठी ६ हजारांची लाच …जाळ्यात

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: कोंबडी फार्म सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसन्नावर लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. लोकायुक्त डीवायएसपी निरंजन यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

खानापूर तालुक्यातील कामशिनकोप्प येथील माजी सैनिक उदय चावळगी यांनी कोंबडी फार्म सुरू करण्यासाठी आवश्यक NOC मिळविण्यासाठी अर्ज केला होता.

प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी झाल्याचा आरोप करत त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्यासाठी भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस यांनी मदत केल्याचे सांगण्यात येत आहे.

 belgaum

तक्रारीची दखल घेत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी ६ हजार रुपये स्वीकारताना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पकडल्याचे सांगण्यात येते. सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी झाल्याची माहिती होती. मात्र, सापळ्यादरम्यान ६ हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

या कारवाईनंतर खानापूर तालुका आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास लोकायुक्तांकडून सुरू असून, कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. तपासातून या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.