belgaum

कोका प्रकरणातील मुख्य आरोपीला सशर्त जामीन

0
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील मुख्य जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी कोका (KOCA) प्रकरणातील आरोपी वरून परशुराम जाधव (रा. दुसरा क्रॉस, नेहरू नगर, बेळगाव) याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

दि. २४ जुलै २०२६ रोजी सीसीबी पोलिसांनी व्हीटीयू युनिव्हर्सिटी परिसरात छापा टाकून आकाश डोडमनी याच्याकडून १ किलो ७०० ग्रॅम गांजा जप्त केला होता.

चौकशीदरम्यान आकाशने हा गांजा कार्तिक चिकलकर याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कार्तिक चिकलकर आणि वरून जाधव या दोघांना ६ ऑगस्ट रोजी अटक केली. गांजा खरेदीसाठी वरून जाधव याने आर्थिक मदत केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

 belgaum

या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर कोका अ‍ॅक्ट आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. ६ ऑगस्टपासून हिंडलगा कारागृहात असलेल्या वरून जाधव याने जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने दोन जामीनदार, रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी आणि कोर्टाच्या तारखेला उपस्थित राहण्याच्या अटींवर जामीन मंजूर केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.