बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करण्याची मागणी करणारा ठराव खानापूर तालुका प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण संस्थेच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील होते.
सभेची सुरुवात बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते धनंजय कदमकर, शिवसेना नेते व्ही. पी. पाटील, करवे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय बनोशी, यशवंत बिरजे, विरूपाक्ष पाटील, संजय कामत यांनी दीपप्रज्वलन करून केली.
वार्षिक अहवालाचे वाचन सुदिपगौडा पाटील व नारायण पाटील यांनी केले. भागधारक शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्थपणे उत्तरे चेअरमन मुरलीधर पाटील यांनी दिली, तसेच शेतकऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, यशवंत गावडे, कल्लाप्पा धाडी, विजय कामत, यशवंत बिरजे, विश्वनाथ डिचोलकर, दत्तात्रय वनोशी, संजय सुतार, करवे तालुका अध्यक्ष विठ्ठल हिंडलगेकर, भरत कुंभार, राजू कुंभार, पुंडलिक पाटील, रणजित पाटील आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सभेला बँकेचे संचालक कुतुबुद्दीन विजापुरे, अशोक पाटील, सुभाष गुरव, निळकंठ गुंजीकर, सुनील झोमाणे, यल्लप्पा शेळके, श्रीकांत कारंजगी, शंकर सेडेकर, सौ. लक्ष्मी पाटील, सौ. सुलोचना अंबेवाडकर यांच्यासह सुमारे ७०० भागधारक शेतकरी उपस्थित होते. संचालक नारायण पाटील यांनी आभार मानले.





