मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. पूर्वी घरफोड्या आणि चेन चोरीच्या घटना उघडकीस येत होत्या आता काही महिन्यांपासून मंदिरेही असुरक्षित झाली आहेत. चोरट्याने आता मंदिरावरही डल्ला मारण्यास सुरुवात केली आहेत. त्यामुळे मंदिरेही किती सुरक्षित राहिली आहेत? हे प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बेळगाव येथील प्रसिद्ध देवस्थान असलेले शनी मंदिर येथे ही चोरीची घटना घडली आहे. शहरातील मधवरी भागात ही चोरी झालल्याने अनेक मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांनी याकडे लक्ष देन्याची गरण आहे.
शहरात याआधी विविध मंदिरात चोर्यांचे प्रकार घफ्ले आहेत. संबंधितांनी पोलीस स्थानकात तक्रारी दिल्या असल्यातरी याबाबत पोलिसांनी किती चोरत्याना पकडले आहे? या प्रश्न अनुत्तरीतच आहे. याबाबत पोलुस प्रशासनाणे प्रत्येक मंदिरात सीसीटीव्ही बसविण्यावही गरज निर्माण झाली आहे.
शनी मंदिरातील देवाच्या मूर्तीवरील सुमारे 20 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरत्यानि लांबविले आहेत. जर या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असते तर चोरट्यांनी छबी कैद झाली असती. यापुढे तरी याबाबत विचार करून दक्षता घेण्याची गरज आहे. या पूर्वीही अनेक मंदिरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मंदिरे किती सुरक्षित आहेत? याचा विचार करण्याची गरज आहे.