मागील काही महिन्यांपासून चोऱ्या आणि घरफोडयांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग चित्ता जनक वाटू लागला आहे. त्यामुळे हा सहभाग थांबविण्यासाठी जागृती तसेच कार्यशाळा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
चोरी, घरफोडयां तसेच इतर गुन्हे वाढत आहेत. याचे करण विचारात घेतले असता बेकारी आणि गरीबी आणि लागलेले व्यसनात गुरफटलेल्या मुलेच याचे कारण असल्याचे दिसून येत आहे. बेळगावात सध्या गांजा, ड्रक्स आणि इतर अमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढत असताना असे प्रकारात अडलेल्या मुलांकडून गैरप्रकार घडत आहेत.
याबाबत पोलीस प्रशासनाने आशा प्रकरणात अडकलेल्या मुलांना बाल सुधार गृहात पाठवून त्यांना सुधारण्यासाठी पाठविण्यात येते. मात्र व्यसनाच्या आहारी गेलेली मुले पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्यात गुंततात. त्यामुळे अशा मुलांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन आणि व्यसनापासून परावृत्त करण्यावर भर देण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.
बेळगावात मागील काही महिन्यांपासून अवैध प्रकरणात मुलांचा वाढता वावर ही भविष्यात धोक्याची घंटा आहे. याचा विचार आतापासून घेऊन शहरी ते ग्रामीण भागातील मुलांना अथवा शाळेतील विध्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यावर भर दिला पाहिजे. जेणे करून भावी आयुश्यात होणाऱ्या दुर्घटना टाळता येणे शक्य होणार आहे. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून जबाबदारी झटकल्याचे दिसून येत आहे.