Monday, January 27, 2025

/

‘महापौरांच्या आधी गंगा पूजनाचा आमदार बेनकेंचा उतावळेपणा’

 belgaum

बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारं राकसकोप जलाशय भरलं की गंगापूजन केलं जातंय .दरवर्षी गंगा पूजन करण्याचा मान बेळगावचे प्रथम नागरिक असलेले महापौरांचा असतो. वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू आहे.गंगापूजन  महापौरांनी करावे  हा प्रोटोकॉल आहे मात्र उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी या परंपरेला छेद दिला आहे.

महापौरांना त्यांची सोयीची तारीख,वेळ  विचारून पाणी पुरवठा मंडळाचे अधिकारी  महापौरांची मान्यता घेऊन तारीख आणि वेळ ठरवतात . त्यानुसार सर्व 58 नगरसेवक,महापौर उपमहापौर आयुक्त,अन्य वरिष्ठ अधिकारी हे राकसकोप जलाशयावर जातात ही आज पर्यंतची पद्धत आहे .पण उतावीळ झालेल्या  उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी या प्रोटोकॉलचा भंग करून दूर करून आपणच  परंपराच  मोडीत काढली आहे.Ganga pujan.. दरवर्षी पावसाळा सुरू होऊन जलाशय भरताच पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी महापौरांना कळवतात मग महापौर सर्व नगरसेवकांना आयुक्तांना विश्वासात घेऊन एक तारीख ठरवतात त्या नुसार जलाशयावर जाऊन गंगापूजन होते मात्र बेनके  यांनी बुधवारी सकाळी आपल्या मोजक्या समर्थकांसह राकसकोपला जाऊन गंगा पूजन केले.या नंतर सोशल मीडियावर आमदार समर्थकांनी गंगापूजन फोटो वायरल केले त्यानंतर महापौर यांनी गंगा पूजन करायचे सोडून एकटेच आमदार कसे काय गंगापूजन करू शकतात अशा प्रतिक्रिया  समाजसेवक, जेष्ठ नगरसेवक आणि माजी महापौरातून व्यक्त झाल्या.

‘आमचं गंगा पूजन येत्या  सोमवारी’- चिकलदिनी

 belgaum

सोमवारी मला पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांचा फोन होता. त्यानुसार त्यांनी मला गंगा पूजनासाठी तारीख ठरवायला सांगितली .त्यानुसार सर्वाना विश्वासात घेऊन आम्ही सोमवारी गंगापूजन करण्याचे ठरवले आहे. मात्र आज आमदारांनी केलेल्या गंगा पूजनाची मला कल्पना नाही,अजून पर्यँत कुणी आमदारांनी प्रोटोकॉल मोडला नव्हता तो बेनके यांनी मोडलाय अशी प्रतिक्रिया महापौर बसपप्पा चिखलदिनी यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली.

‘आमच्या सोबत गंगा पूजनाला आले असते तर शोभा वाढलो असती’- पुजारी

या अगोदर कोणत्याही आमदारांनी गंगापूजन केलेलं नाही बेनके यांनी गंगापूजन करून उतावीळपणा दाखवलाय तेही एक लोकप्रतिनिधी आहेत महापौर उपमहापौरा सोबत शासकीय गंगापूजनाला उपस्थित राहिले असते शोभा आली असती अशी प्रतिक्रिया उपमहापौर मधूश्री पुजारी बेळगाव live कडे बोलताना दिली आहे.

‘आमदारांनी नवीन पायंडा पाडला’- परब

जिल्हाधिकारी आणि 58 नगरसेकांच्या उपस्थितीत गंगापूजन केलं जातंय ही परंपरा आहे मात्र या आमदार महोदयांनी प्रोटोकॉल मोडलाय अन एक नवीन पायंडा रचलाय, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी गट नेते पंढरी परब यांनी बेळगाव live कडे खास नोंदवली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.