एरव्ही रस्त्यावरून ये जा करणाऱ्याना अडवून दंड लावणाऱ्या पोलिसांची सामाजिक बांधिलकी पाहायला मिळाली.खड्ड्यामुळे अपघात होतात हे निदर्शनाला आल्यावर पोलिसांनी आता चक्क खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे .
गेले काही होत असलेल्या पावसामुळे गांधी नगर एस सी मोटर्स जवळ पाणी साचलं होतं रस्त्यावरचं मोठं मोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहन धारकांना इथून ये जा करतांना तारेवरची कसरत करून मार्ग काढावा लागत होता.या ठिकाणी अनेक किरकोळ अपघात होऊन वाहन धारकांना मनस्ताप सहन करावा लागत होती. या त्रासाची जाणीव झालेल्या बेळगावच्या रहदारी पोलिसांनी स्वतःच खड्डे बुझवले आहेत.
ट्रॅफिक पोलीस उपनिरीक्षक एम बी गुजनाळ, हवालदार भीमपा चौगुला आणि चालक मुरुगेश पाटील या तिघांनी मिळून खड्डे बुझवण्याचे काम केल आहे.
गांधी नगर ब्रिज च्या खाली पाणी जमत आहे दुरुस्ती करा असे अनेकदा सार्वजनिक बांधकाम खात्याला विनंती केली असता त्यांनी दुर्लक्ष केलं मात्र अपघात होऊ नयेत म्हणून मी त्यांना सूचना केली होती त्यानुसार त्यांनी सेवा केली असल्याची प्रतिक्रिया उत्तर रहदारी पोलीस निरीक्षक आर आर पाटील यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली.
काल पासून पावसाने उसंत घेतल्याने रस्त्यावरील पाणी ओसरलं होत बुधवारी सकाळी हेल्मेट सक्ती सक्तीच्या कारवाई साठी आलेल्या रहदारी पोलिसांना हे खड्डे निदर्शनास येताच त्यांनी हातात फावडे घेऊन खड्डे मुजवण्यास सुरुवात केली अन काम पूर्ण केले.वास्तविक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीनं रस्ता दुरुस्तीकरण केलं जातंय मात्र अलीकडे बेळगाव पोलीस सेवा भावी होत असून अपघात होऊ नये म्हणून खड्डे बुझवण्याचे देखील काम करताहेत हे नक्कीच कौतुकास्पद आहे.