मराठा लाईट इन्फंट्रीची स्थापना होऊन अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.पुणे येथेया मोहिमेला लेफ्टनंट जनरल डी. आर.सोनी यांनी ध्वज दाखवून शुभारंभ केला.
यावेळी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे,मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडन्ट ब्रिगेडियर गोविंद कलवड उपस्थित होते.ध्वज दाखविण्या बरोबरच प्रातिनिधिक स्वरूपात बर्फाची कुऱ्हाड देखील मोहिमेचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल योगेश धुमाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
कारगिल पासून साठ किमी अंतरावर असणाऱ्या माउंट कुन वर मराठाचे पथक चढाई करणार आहे.७०७७ मीटर अर्थात २३२१८ फूट इतकी याची उंची आहे.माऊंट कुन वर चढाई करण्यासाठी एकूण तीस अधिकारी आणि जवानांची तुकडी निघाली आहे.या गिर्यारोहकांनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे.बेभरवशाचे हवामान,मार्गातले अडथळे ,गोठवणारी थंडी याना तोंड देत मराठाचे गिर्यारोहक माऊंट कुन वर आपले निशाण रोवणार आहेत.मराठा लाईट इन्फंट्रीच्या शौर्याचे,ऐतिहासिक वारशाचे स्मरण करण्यासाठी म्हणून गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे