हेल्मेट परिधान केल्या शिवाय दुचाकीना पेट्रोल मिळणार नाही या मोहिमेची पोलीस आयुक्तांनी पाहणी केली आहे. मंगळवारी पोलीस आयुक्तांनी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीना पेट्रोल द्यावा असा आदेश पेट्रोल पंप धारकांना काढला होता या आदेशाची अंमल बजावणी साठी आज बुधवारी आयुक्त डी सी राजप्पा यांनी शहरातील अनेक पेट्रोल पंपाना भेटी देऊन पाहणी केली.
अनेक पेट्रोल पंपावर स्वत जाऊन पोलीस आयुक्तांनी माहिती जाणून घेतली पोलीस खात्याने चालवलेल्या या मोहिमेस पंप मालकांनी आणि जनतेने सहकार्य करावा असे आवाहन देखील पोलीस आयुक्तांनी दिल आहे. हेल्मेट नसताना पेट्रोल बरून घ्यायला येणाऱ्या दुचाकी स्वरांना नोटीस बजावणार असल्याचे देखील पोलीस खात्याने स्पष्ट केले आहे. हेल्मेट सक्तीची काटेकोर पणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याने पेट्रोलपंप मालकांना देखील यात सामील करून अंमल बजावणी करण्यास सुरुवात केली आहे.