प्रत्येक शनिवारी रात्रभर धिंगाणा घालण्याचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किर्लोस्कर रोड वरील एक टॉप हॉटेलच्या नाईट क्लबवर पोलिसांनी आत्ताच रात्री उशिरा छापा मारला आहे.
स्वतः पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आणि इतर पोलीस अधिकारी याठिकाणी...
स्मिता पाटील बनल्या होममिनिस्टर स्पर्धेच्या विजेत्या
नियती फाऊंडेशन आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा उत्साही वातावरणात बी के मॉडेल हायस्कुलच्या मैदानावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडली.स्मिता पाटील या होम मिनिस्टरचे विजेतेपद पटकाविले.संज्योती धामणेकर द्वितीय आणि बिना तलाठी या तृतीय पुरस्काराच्या विजेत्या...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी अनेकदा कर्नाटकातील हिंदू मंदिरांना भेटी दिल्या होत्या.गांधी कुटुंब कधीही कर्नाटकात आले तर ते दर्शनाला जातेच भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतलाय का असा संतप्त सवाल गृह मंत्री रामलिंग रेड्डी...
संगोळी रायाणा सोसायटीच्या माध्यमातून ठेवीदारांची फसवणूक झाली असतांना आणि याबद्दल प्रकरण न्यायालयात गेलेले असतांना पोलीस आणि न्यायालयाची नजर चुकवून मालमत्ता विकणाऱ्या आनंद अप्पूगोळ याच्या साथीदारास बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे.
संजय पाटील असे त्याचे नाव असून या प्रकरणात बेळगावचे सब...
महात्मा फुले रोडवर एक नवे हिरवे मैदान बनवले आहे. या मैदानावर कोरे गल्लीच्या मुलांनी स्वतःच एक पीच हिरवळ मैदान बनवल आहे. ३ मार्च पासून येथे क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.
मैदानाच नसल्याने शेवटी खासगी जागा निवडून मुलांनी ही खेळण्याची सोया करून...
जस जशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तस तशी समितीत एकीच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे आजवर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती किरण ठाकूर गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाकडून समितीची एकी करण्यासाठी धडपडत असणाऱ्या पाईकांना पहिला पाठींबा देण्यात आला आहे.
शनिवार...
बेळगाव चा स्केटिंगपटू रोहन कोकणे याने तिसऱ्यांदा लिम्का जागतिक विक्रमावर आपले नाव कोरले आहे.
२८ मे रोजी केएलई च्या स्केटिंग रिंक वर त्याने आपल्या हनुवटीवर ३० फुटाचा पाईप ठेऊन तोल सांभाळत स्केटिंग केले होते. ४.३ किलो वजनाचा तो पाईप २.१९...
बेळगावचे जिल्हाधिकारी एस झियाउल्ला यांनी नुकताच सर्व फलकांचे कानडीकरण करण्याचा फतवा काढला, यावर आवाज उठवणारे एक निवेदन मध्यवर्ती म ए समितीच्यावतीने त्यांनाच देऊन ही सक्ती म्हणजे अधिकारांची गळचेपीच आहे, अशी भावना मांडण्यात आली.
मध्यवर्ती चे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे,...
पुढील महिन्यात कर्नाटकात होणाऱ्या विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बेळगावात कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्राच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली.
शासकीय विश्राम धामात झालेल्या बैठकीस महाराष्ट्रातून कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, बेळगाव उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार,उत्तर गोव्याचे...