बेळगाव पोलीस दलाचे फेसबुक वर सुरू करण्यात आलेले ट्रॅफिक पेज बंद पडले आहे. मे २०११ मध्ये काढण्यात आलेले हे पेज अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर वापरलेच गेले नाही, याची नोंद घेऊन नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी नव्या पेजची सुरुवात करावी.
सध्या कमिशनर ऑफ पोलीस हे पेज कार्यरत असून नागरिकांना स्वतः पोलीस आयुक्त तात्काळ प्रतिक्रिया देतात ही चांगली गोष्ट आहे. याच प्रमाणे रहदारी या गंभीर विषयाकडेही लक्ष दिले जावे, ज्याठिकाणी रहदारी संदर्भातील सूचना नागरिकांना मांडता याव्यात, आणि कार्यक्षम रहदारी व्यवस्था अंमलात आणली जावी.
ट्रॅफिक समस्यांवरील पेज स्वतंत्रच असावे आणि ते ट्रॅफिक विभागाचे एसीपी यांच्या नियंत्रणात असावे अशी गरज आहे. सोशल मीडियाचा असा वापर करून पोलीस दल अनेक समस्यांना न्याय देऊ शकते, याकडे लक्ष दिले जावे.