झायलो गाडीने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार ने पेट घेतल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी तीन च्या दरम्यान घडली आहे.
भरतेश शिक्षण संस्थेच्या मालकीची ही गाडी असून बेळगाव हुन हलग्या कडे जात असताना हायवेवर अलारवाड क्रॉस जवळ हा प्रकार घडला आहे.
गाडी झाडाला आदळल्यावर कार चालक बाहेर आला त्यानंतर या गाडीने पेट घेतला मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी घडली नाही.बागेवाडी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
महामार्गावरून जाणाऱ्या लोकांना ही बर्निंग कार धडकी भरवणारी ठरली, या घटनेत चालक बाहेर आला नसता तर तोही जळून खाक होण्याचा धोका होता पण सुदैवाने तसे होण्याचे टळले.