belgaum

गदगनजीक कार अपघातात बेळगावचे दोघे जागीच ठार

0
20
Road accident logo
Road accident logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह:चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार महामार्गा शेजारील शौचालयाला जाऊन धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात बेळगावचे दोघेजण जागीच ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गदग शहराबाहेरील कळसापूर क्रॉस नजीक हुबळी -होस्पेट राष्ट्रीय महामार्गावर घडली.

अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशांची नावे सिद्धय्या पाटील आणि बाबू तारीहाळ अशी असून हे उभयता बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यामधील रहिवासी होते. त्याचप्रमाणे गंभीर जखमी झालेल्याचे नांव शशी पाटील असे असून त्याला उपचारासाठी गदगच्या कीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आश्चर्य म्हणजे अपघात घडताच कार गाडीतील एअर बॅग्ज ओपन होऊन देखील दोघांना आपला जीव गमवावा लागला.

 belgaum

चालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे कार चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते. स्थानिक ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.