भर बाजारात पार्किंग केलेल्या वाहनातून चोरीचे प्रकार

0
6
Theft ravivar peth parking is area
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या रविवार पेठेत भरदिवसा मालवाहू वाहनातील साहित्य चोरीला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवार पेठेत अनेक होलसेल व्यावसायिक आहेत.

याठिकाणी ग्रामीण भागासह उपनगरातील घाऊक व्यापारी आठवडी बाजारासाठी, साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. साहित्य खरेदी करून ज्या मालवाहू वाहनात हे साहित्य भरले जाते ती वाहने रविवार पेठ भागात पार्किंगसाठी उभी करण्यात येतात. मात्र गेल्या ७ – ८ दिवसात पार्किंग करण्यात आलेल्या वाहनातील साहित्य चोरीला जात असल्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

मालवाहू वाहनातील तेलाचे डबे यासह इतर साहित्य चोरीला जात असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या चार दिवसात मालवाहू वाहनातून जवळपास ७ ते ८ तेलाचे डबे चोरीला गेले आहेत.Theft ravivar peth parking is area

 belgaum

हा प्रकार वारंवार घडत असून याभागात लक्ष ठेवून अज्ञातांकडून पूर्वनियोजन करून चोरीचे प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सातत्याने होत असलेल्या चोरीचे प्रकार रोखण्यासाठी बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.