विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून राज्यातील 5 कोटी 30 लाख 85 हजार 566 सामान्य मतदारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये 2,66,82,156 पुरुष, 2,73,98,483 महिला आणि 4927 इतर मतदार आहेत. त्याचप्रमाणे यातील बेळगाव जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 39 लाख 47 हजार 150 इतकी आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या 39.47 लाख मतदारांच्या अंतिम यादीमध्ये 19 लाख 90 हजार पुरुष, 19 लाख 56 हजार महिला आणि 151 इतर (तृतीयपंथीय) मतदारांचा समावेश आहे. यावेळी जिल्ह्यात मोठ्या संख्येने युवा मतदारांची भर पडल्यामुळे राज्यात बेळगाव जिल्हा अव्वल ठरला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या प्राथमिक मतदार यादीत 38 लाख 33 हजार 37 मतदारांची नोंद होती. मात्र 29 मार्चनंतर केवळ 25 दिवसात एक लाख 14 हजार 113 मतदारांची यादीत भर पडली आहे. यामध्ये युवा मतदारांची संख्या अधिक आहे. गेल्या 29 मार्च अखेर 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 79,495 इतकी होती. मात्र त्यानंतर त्यात भर पडली असून एकत्रित वाढीव मतदारांची संख्या 1 लाख 14 हजार 113 इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण मतदार संख्येची मतदार संघ निहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे.
बेळगाव दक्षिण : पुरुष 124922, महिला 123119, इतर 11, एकूण -2,48,052. बेळगाव उत्तर : पुरुष 124092, महिला 127143, इतर 11, एकूण -2,51,246. बेळगाव ग्रामीण : पुरुष 130106, महिला 127126, इतर 9, एकूण -2,57,241. खानापूर : पुरुष 109732, महिला 102922, इतर 10, एकूण -2,12,664. यमकनमर्डी : पुरुष 100217, महिला 100822, इतर 8, एकूण -2,01,047. निपाणी : पुरुष 113856, महिला 111826, इतर 9, एकूण -2,25,688. चिक्कोडी -सदलगा : पुरुष 112437, महिला 111388, इतर 9, एकूण -2,23,834. अथणी : पुरुष 116641, महिला 111499, इतर 4, एकूण -2,28,144. कागवाड : पुरुष 99574, महिला 95430, इतर 4, एकूण -1,95,008. कुडची : पुरुष 99043 महिला 94096 इतर 14, एकूण -1,93,153. रायबाग : पुरुष 108127, महिला 102369, इतर 9, एकूण -2,10,505. हुक्केरी : पुरुष 103117, महिला 103449, इतर 8, एकूण -2,06,574. अरभावी : पुरुष 124244, महिला 123404, इतर 8, एकूण -2,47,656. गोकाक : पुरुष 125635, महिला 128996, इतर 19, एकूण -2,54,650. कित्तूर : पुरुष 98176, महिला 96087, इतर 5, एकूण -1,94,268. बैलहोंगल : पुरुष 97607, महिला 97233, इतर 2, एकूण -1,94,842. सौंदत्ती यल्लमा : पुरुष 99976, महिला 99306, इतर 2, एकूण -1,99,284. रामदुर्ग : पुरुष 103354, महिला 99931, इतर 9, एकूण -2,03,294.
राज्यातील एकूण सामान्य मतदार संख्या 5,30,85,566 इतकी असली तरी 47,488 इतके सेवा मतदार धरून ती एकूण 5,31,33,054 इतकी होते. त्याचप्रमाणे 2,66,82,156 इतक्या सामान्य पुरुष मतदारांची संख्या 45,897 सेवा मतदार पकडता एकूण 2,67,28,053 इतकी होते. तसेच 2,66,82,156 इतक्या सामान्य महिला मतदारांची संख्या 45,897 सेवा मतदार पकडता एकूण 2,64,00,074 इतकी होते. राज्यात सर्वाधिक 39,47,150 मतदार बेळगाव जिल्ह्यात असून त्या खालोखाल बेंगलोर शहराचा (36,74,395) क्रमांक लागतो. राज्यात सर्वात कमी म्हणजे 4,56,313 इतके मतदार कोडगु जिल्ह्यात आहेत.
2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील मतदान केंद्रांची संख्या 58,008 होती ती यावेळी 2023 मध्ये वाढवून 263 सहाय्यक मतदान केंद्रांसह एकूण 58,545 इतकी करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 115709 बीयू, 82543 सीयू, 89379 व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर केला जाणार आहे. निवडणूक सुरळीत शांततेने पार पडावी यासाठी आदर्श आचारसंहिते खातर राज्यभरात 54,682 नागरी पोलीस, 20,000 गृह रक्षक जवान, 90 कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या (केएसआरपी) कंपन्या, 5037 सीएआर /डीएआर आणि 650 एसएपी /सीएपीएफ कंपन्या बंदोबस्तासाठी तैनात केल्या जाणार आहेत. भरारी पथकं, एसएसटीएस आणि पोलीस प्रशासनाने बेकायदा रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आणि फुकटच्या वस्तू वाटप प्रकरणी राज्यभरात आतापर्यंत 2,036 एफआयआर अर्थात गुन्हे दाखल केले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 69,778 शस्त्रे सरकार जमा झाली आहेत. त्याचप्रमाणे 18 शस्त्रे जप्त करण्यात आली असून 20 शस्त्रांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमांतर्गत 5080 गुन्हे नोंदविण्यात आले असून 8,572 जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. याखेरीज 13640 जणांच्या विरोधात निवडणूक घोषित झाल्याच्या तारखेपासून अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.