Tuesday, January 21, 2025

/

मुंबईच्या असहाय्य वृद्धाला ‘यांनी’ मिळवून दिला नोकरीसह आसरा

 belgaum

बेळगावात उपचारासाठी आलेल्या परंतु खिशातील पैसे संपल्याने असहाय्य बनलेल्या मुंबईच्या एका बेघर वयस्कर इसमाच्या मदतीला धावून जात बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला नोकरीसह राहण्यासाठी आसरा मिळवून दिल्याची घटना काल मंगळवारी घडली.

याबाबतची माहिती अशी की, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना काल मंगळवारी त्यांचा मित्र सुरज अणवेकर यांचा फोन आला. त्याने रॉय नावाचे मुंबई येथील एक सद्गृहस्थ कॅम्प येथील सेंट जोसेफ हायस्कूल शेजारील दर्ग्यामध्ये असहाय्य अवस्थेत झाडाखाली झोपले असून त्यांना मदतीची गरज असल्याची माहिती दिली.

त्यानंतर सुरज याने उपाशी असल्यामुळे दीन झालेल्या रॉय यांना कॅम्प मधील जवळच्या हॉटेलमधून खाद्यपदार्थ आणि पाणी आणून दिले. दरम्यान कॅम्प दर्ग्यामध्ये दाखल झालेल्या संतोष दरेकर यांनी रॉय यांची विचारपूस केली असता त्यांचे नांव शंकर रामचंद्र रॉय असल्याचे आणि ते मूळचे कर्वे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. आपण उपचारासाठी बेळगावात आलो होतो. मात्र आता पैसे संपले आहेत असे रॉय यांनी सांगितले.Fb friend circle

तेंव्हा दरेकर यांनी मुंबईला परत जाण्याची व्यवस्था करून देतो असे सांगितले. त्यावेळी त्यांनी मुंबईला आपले स्वतःचे कोणी नसल्यामुळे तेथे परत जाण्यास नकार दिला. तसेच भीक मागून किती दिवस जगणार मला एक नोकरी द्या अशी विनंती केली. आधार कार्ड असलेल्या राव यांचे वय 55 वर्षापेक्षा अधिक असून त्यांची आई अलीकडेच निधन पावली आहे. त्यांना कोणीही नातलग नाही.

अविवाहित असलेल्या शंकर रॉय यांना मराठी आणि हिंदी उत्तम प्रकारे बोलता येते. त्यांना कॉम्प्युटरचे देखील ज्ञान आहे. कॅम्प दर्गा येथे रॉय यांची विचारपूस केल्यानंतर संतोष दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅम्प पोलिसांच्या मदतीने राव यांना प्रथम शनिवार खुट येथील डॉ. माधव प्रभू यांच्या दवाखान्यात नेऊन त्यांची प्रकृती तपासून घेतली. त्यानंतर आपले मित्र अभिमन्यू दागा आणि किरण निप्पाणीकर यांच्या मदतीने रॉय यांना राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेसह नोकरीही मिळवून दिली. याबद्दल वयस्कर शंकर रॉय यांनी सर्वांचे शतशः आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.