Thursday, October 31, 2024

/

पोर्तुगालमधील जागतिक नृत्य स्पर्धेसाठी बेळगावच्या कलाकारांची निवड

 belgaum

बेंगळुरू : पोर्तुगाल येथे होणाऱ्या जागतिक नृत्य स्पर्धेसाठी बेंगळुरू येथे झालेल्या चाचणी नृत्य स्पर्धेत गणेशपूर येथील एम. स्टाईलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यांची पोर्तुगालमधील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

एम. स्टाईलची विद्यार्थिनी प्रेरणा जाधव हिने सुवर्ण पदक पटकाविले आहे. क्रितिका गावडे व सान्वी मुंगारे यांनी दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदक तर गट स्पर्धेत पार्थ गोणबरे, वैष्णवी माळगी, तन्वी इटगीकर, प्रथमेश मिसाळ, माही माळगी, सृष्टी भंडारी, क्रितिका गावडे, संजना चव्हाण, अथर्व भंडारी, श्रावणी गोधोळकर, सान्वी मुंगारे या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक मिळविले.

जागतिक नृत्य स्पर्धेचे परिक्षक जुलिनो अल काँटरा यांनी यावेळी परिक्षक म्हणून काम पाहिले. बेंगलोर येथील नृत्य स्पर्धेत २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. अटीतटीने झालेल्या या स्पर्धेत एम. स्टाईलने दोन सुवर्ण पदके व एक रौप्य पदक मिळविले.

या विद्यार्थ्यांची पोर्तुगाल येथे होणाऱ्या डान्स वर्ल्ड कप या जागतिक नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दि. ३० जून ते ८ जुलै २०२३ पर्यंत होणार आहे. गेली ६ वर्षे एम. स्टाईलच्या विद्यार्थ्यांनी जागतिक नृत्य स्पर्धेत आपले नाव कोरले आहे.

या यशाबद्दल एम. स्टाईल डान्स अँण्ड झुंबा फिटनेस अकादमीच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नृत्य प्रशिक्षक महेश जाधव यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.