बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोग १२ निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करणार आहे. भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अठरा मतदारसंघांपैकी काही ठिकाणी दोन मतदारसंघांसाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील १८ मतदार संघांसाठी पुढीलप्रमाणे खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे-
* निप्पाणी-तरुणा रेड्डी गंगिरेड्डी
* चिक्कोडी आणि अथणी मतदारसंघ: अर्णब सरकार
*कागवाड- आणि कुडची: चनबाशा मीरण
* रायबाग आणि हुक्केरी: सिद्धार्थन टी,
* अरबी : सुमंत श्रीनिवास ए.एस
* गोकाक : मधुकर आवसे
* यमकनमर्डी : राकेश जे. राणा
* बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण : अतुलकुमार पांडे
*बेळगाव ग्रामीण : सुबोध सिंग
* खानापुर आणि कित्तूर: संजीत सिंग
* बैलहोंगल आणि सौंदत्ती यल्लम्मा मतदारसंघ: योगेश यादव
* रामदुर्ग मतदान केंद्र : एम. एझीलारसन