बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांचा शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रचाराचा धडाका आता वाढला असून ठीकठिकाणी ॲड. येळ्ळूरकर यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलावर्ग आणि युवकांचा सहभाग दिसून येत आहे.
समितीचे उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचारा दरम्यान मराठी भाषिकांचे प्राबल्य असणाऱ्या गल्ल्यांमध्ये युवक आणि महिलांसह मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग दिसत आहे. शहरातील मारुती गल्ली येथील श्री मारुती मंदिरामध्ये पूजन करून बुधवारी प्रचाराला सुरुवात करण्यात आली. ही प्रचार फेरी कडोलकर गल्ली, बापट गल्ली, भातकांडे गल्ली, मेणशी गल्ली, पांगुळ गल्ली, भोई गल्ली आदी परिसरात काढण्यात आली.
यावेळी माजी नगरसेविका मीना वाझ, रायमन वाझ, मल्हारी कुराडे, अरुण मुतकेकर, सतीश अनगोळकर, किरण कावळे, सुनील मुतकेकर, लक्ष्मण हांगिर्गेकर, संजय मुतकेकर, अमित अनगोळकर, बंडू डोंगरे, भाऊ बर्डे, श्रीपाद भातकांडे, विक्रम भातकांडे, सोमनाथ भातकांडे, भाऊ माळी, रेणू भातकांडे, कृपा भाटी, धनश्री बर्डे, सुजाता भातकांडे, श्री ब्रम्हलिंग देवस्थान , मृत्युंजय युवक मंडळ, दीपक गोडसे, कलावती माता संघ, धनलक्ष्मी संघ, सिध्दकला संघ, कालिका देवी युवक आणि महिला मंडळ, गोपाळ केसरकर, सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, अंकुश केसरकर, गजानन निलजकर, शुभम मोरे, सुवर्णा कणबरकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रचाराप्रसंगी उपस्थित होते.
ॲड. अमर येळ्ळूरकर यांचे ठीकठिकाणी ओवाळणी करून फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात येत होते. प्रचार पदयात्रेच्या मार्गावरील संपूर्ण वातावरण यावेळी समितीमय झाले होते.
दिनांक 27 रोजी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री अमर येळूरकर यांचा प्रचार शहरातील व्यापारी भागात करण्यात आला अनेक वर्षानंतर बेळगावच्या शहरी भागामध्ये समितीमय वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे. बेळगावच्या मूळ 18 गल्ल्यामधील होणाऱ्या या प्रचारामुळे मराठी लोकांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे महिला युवक कार्यकर्ते यांच्या उस्फुर्त सहभागामुळे प्रचारामध्ये आणखीन रंगत येत आहे. आझाद गल्ली मेणशी गल्ली टेंगिनकर गल्ली
केली माळी गल्ली कामत गल्ली आदी प्रमुख गल्यांमधून निघालेल्या प्रचार फेरीमुळे पुन्हा एकदा समितीची मशाल उजळलेली दिसत होते. गेल्या पंचवीस वर्षात बेळगावच्या शहरी भागातून समितीचा आमदार निवडून आला नाही त्याची कसर यंदाच्या निवडणुकीत भरून काढण्याचा निर्धार जनतेने केलेला दिसतो या प्रचार फेरीदरम्यान महिला व युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या प्रचार फेरीमध्ये अशोक बेळगुंदकर अमित माणसे विजय काकतकर दुर्गेश घसारी दीपक गायकवाड भरत कित्तुरकर राजश्री हलगेकर एडवोकेट प्रफुल टपाल वाले शिवाजी हलगेकर सुनील ढमाले यांच्यासह समितीचे जेष्ठ कार्यकर्ते आजी-माजी नगरसेवक महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होते.