भाजी मार्केट संदर्भात निर्माण झालेल्या पेच प्रसंगात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एपीएमसीत माल पडून ग्राहक कमी आणि कॅन्टोन्मेंट मध्ये माल नाही आणि ग्राहक जास्त अशी परिस्थिती असून व्यापाऱ्यांना माल बाहेरच्या बाहेर विकावा लागत आहे.
भाजीमार्केट एपीएमसीत भरवण्याचा चंग बांधलेल्या प्रशासनामुळे ही परिस्थिती आहे.
आज सकाळी पासून पोलीस बंदोबस्त लावून कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट मध्ये भाजी घेऊन उद्देणार्या गाड्यांना अडवून एपीएमसीकडे पाठवण्यात आले, मालाचे काही टेम्पो तेथे गेले आणि तेथे काही माल व्यापाऱ्यांनी खरेदी केला पण एपीएमसीत माल घेण्यास कुणी गेलेले नसल्याने तो माल पडून राहिला आहे.
कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट मध्ये माल घालणाऱ्या शेतकऱ्यांनी गाड्या आडवल्यावर आपल्या व्यापाऱ्यांना फोन करून आपला माल त्यांनाच दिला फक्त व्यवहार मार्केट मध्ये न होता तो बाहेर शेती व इतर ठिकाणी नेऊन बाहेरच्या बाहेर विकण्यात आला आहे.
प्रशासनाच्या या घोळात दोन्ही बाजूंनी व्यापारी व शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे, काही माल शिल्लकही राहत आहे तर एपीएमसीतला माल वाया जाणार आहे, आता जिल्हाधिकार्यानी लक्ष देऊन तोडगा काढण्याची गरज आहे.