शहापूर समितीच्या बैठकीत काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्धार

0
10
Mes meet
 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव सह सीमाभागातील मराठी भाषिक गेली 67 वर्षे स्वाभिमानाने लढा देत असताना बेळगावातील राष्ट्रीय पक्ष स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी मराठी भाषिक आणि मराठा समाजाचा आधार घेत आहेत आणि कारण नसताना त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाला ओढत आहेत असा आरोप करत महाराष्ट्र समिती विरोधी गरळ ओकणाऱ्या नगरसेवक राजू भातकांडे आणि नितीन जाधव यांच्या निषेधाचा ठराव शहापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.

1 नोव्हेंबर काळा दिनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या मुक सायकल फेरीत हजारो मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा आणि काळा दिवस गांभीर्याने पाळण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. काळ्या दिनाची जनजागृती करण्यासाठी शुक्रवारी रात्री राम मंदिर गाडे मार्ग शहापूर येथे शहापूर भागातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती समिती नेते रणजित चव्हाण पाटील होते.

यावेळी राजकीय पक्षातील मराठी आणि मराठा नगरसेवकांनी एक नोव्हेंबरच्या सायकल फेरीत स्वतः होऊन सहभागी व्हावे तेंव्हाच आम्ही तुम्हाला मराठा समजू असे आव्हान माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी देत केंद्र आणि कर्नाटक सरकार देखील आमच्या विरोधी आहे त्यांचा आम्ही निषेध व्यक्त असे मत व्यक्त केले.Mes meet

 belgaum

यावेळी बोलताना युवा कार्यकर्ते सागर पाटील यांनी मागील आठवड्यात सीमा प्रश्नावर तज्ञ समितीची मुंबईत झालेल्या बैठकीची माहिती देताना सीमाभागातील मराठी माणसासाठी आरोग्य योजनांची अंमलबजावणी लवकरच होणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदनाचा देखील ठराव या बैठकीत करण्यात आला.महात्मा फुले आरोग्य योजनेसह इतर आरोग्य सुविधा मिळवून घेण्यासाठी पुन्हा काळ्या दिनानंतर पाठपुरावा करूया असे सांगितले.

1 नोव्हेंबर मुक सायकल फेरी ही कन्नड भाषिकांच्या विरोधात नसून केंद्र सरकारच्या विरोधात आहे आम्ही मराठी भाषिक आहोत हे दाखवण्याठी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मध्यवर्ती समिती सदस्य विकास कलघटगी यांनी युवकांना मार्गदर्शन करताना युवकांनी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी व्हावे आणि मराठी आस्मितेचे दर्शन घडवावे असे आवाहन केले.

यावेळी बोलताना माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी राष्ट्रीय पक्षातील मराठा नगरसेवकांनी जर खरोखर त्यांनी मराठा असतील तर मनपावर भगवा ध्वज आणि महापालिकेवरील काढलेले मराठी फलक बसवण्यासाठी पाठ पुरावा करावा तरच ते मराठा आहेत असे समजू असे आवाहन केले. यावेळी नगरसेवक रवी साळुंके, समिती नेते महादेव पाटील, माजी नगरसेवक राजू बिर्जे, सुधा भातकांडे, सुनील बोकडे, विजय भोसले, अशोक घगवे,राजू पाटील सुधीर कालकुंद्रीकर,सूरज जाधव  सूरज चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.