बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अनगोळ भागातील संत मीरा शाळा मागील बाजूच्या परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आहे का?याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.
बेळगाव दक्षिण भागातील संतमीरा शाळेच्या पाठीमागील दहाहून अधिक भटक्या कुत्र्यांना फस्त केलंय का ?अशी चर्चा उपस्थित होत आहे. अचानक दहा कुत्र्यांना खाल्ल्याने या परिसरात बिबट्या वावर आहे का याची चर्चा जनमानसात रंगत आहे त्यामुळे हे चिंतेचे कारण बनले आहे.
मात्र वनविभागातील काहींच्या म्हणण्यानुसार या भागात पाहणी केली असता त्या प्राण्याच्या पायाचे ठसे बिबट्याचे नव्हते अशी माहिती उपलब्ध झाली आहे. संत मीरा मागील बाजूस असलेल्या अमराईच्या बाजूला सध्या मोठ्या संख्येने बकऱ्याचे वास्तव्य आहे अश्या स्थितीत तो कुत्री खाणारा प्राणी कोणता याचा तपास लागणे गरजेचे आहे.
मागील महिन्यात शास्त्रीनगर भागात आणि शिवाजी नगर परिसरात कोल्हे दाखल झाले होते त्या अगोदर मागील वर्षी रेस कोर्स परिसरात बिबट्या दाखल झाला होता. या सर्व घटनांचा मागोवा घेतला असता बेळगाव शहराच्या जवळ वन्य जिवींचा वावर वाढू लागला आहे.
संत मीरा शाळा परिसरातील दहा भटकी कुत्र्यांना खाणारा प्राणी कोणता याकडे वन खात्याचे लक्ष लागले असून तपास सुरू आहे.