कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महाराष्ट्राचे समनव्यक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात सीमा भागात संतापाची लाट उसळत असून जनक्षोभ वाढतच आहे. सोमवारी सायंकाळी टिळक चौक येथे मराठी भाषिक युवकांनी चंद्रकांत दादांच्या निषेधाच्या घोषणा देत प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं.
गोकाक येथील तवग गावात दुर्गादेवी मंदिर उदघाटन कार्यक्रमात सहभागी होऊन कन्नड अस्मितेचं गाणं म्हटलं होत त्यामुळे बेळगावातील मराठी माणसाच्या भावनाना ठेच पोचली होती या घटनेचे पडसाद बेळगाव सह महाराष्ट्रात उमटले होते. राष्ट्रवादी सह सेनेच्या नेत्यांनी दादांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सोमवारी पुन्हा बेळगावातील टिळक चौकात युवकांनी पुतळा जाळत निषेध केला . यावेळी विजय होनगेकर किशोर मराठे ,विशाल गौडाडकर,अशवजीत चौधरी, सुरज चव्हाण ओंमकार गावडे सह युवक उपस्थित होते.