Saturday, April 20, 2024

/

‘शक्ती दुचाक्या’ पोलीस ताफ्यात दाखल

 belgaum

बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयाच्या व्याप्तीतील प्रत्येक पोलीस स्थानकात नव्या शक्ती दुचाकी सामील करण्यात आल्या आहेत या दुचाकी द्वारे शहरातील सर्व पोलीस स्थाकात गस्त घालण्याच्या सेवेसाठी रुजू होणार आहेत. आधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या शक्ती या दुचाकींचा लाभ शहरातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी होणार आहे.

shakti-bike-squad-police

नवी शक्ती दुचाकी सर्व सोयींनी युक्त असून दोन शिफ्ट मध्ये पोलिसांना हाताळायला मिळणार आहे यात सकाळी ९ ते सायंकाळी ६ तर सायंकाळी ६ ते मध्यरात्री २ पर्यंत गस्त घालण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. या दुचाकी गाडीत रिव्हॉल्व्हर सह सज्ज पोलीस कमर्चारी , टॉर्च ,आणि वायरलेस सेट देखील असणार आहे.

या शक्ती दुचाकी हाताळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर त्या त्या पोलीस स्थानकात उपलब्ध राहणार असून नागरिकांना याची मदत मिळणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.