बेळगाव जिल्हा वस्रोद्योग विभाग उद्यमबाग येथे खऱ्या लाभार्थी पर्यंत शासकीय योजना पोचवा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन परिवार आणि भाजप नेते पांडुरंग धोत्रे यांनी केली आहे.
वडगाव मधील कांही विणकाम करणाऱ्यानी वस्त्रोद्योग विभागात होतकरु विणकरांना दोन पाॅवरलूम घालण्यासाठी तसेच संबधित व्यवसायासाठी शासकिय योजनेतून सवलतीत अर्थ सहाय्य मिळते.त्यासाठी वडगाव भागातील कामगारांनी त्याठिकाणी रितसर अर्ज केले होते त्यात कांही शेतकऱ्यांच्या मुलांनीही दुष्काळात होरपळण्यापेक्षा पुरक व्यवसाय करावा म्हणून अर्ज केले होते पण काही विणकर नेते व एजंटानी सर्वसामान्यांची काळजी न करता त्या योजनांचा लाभ धनाढ्यानां व कांही जनांकडून हजारोनीं पैसे घेऊन लाभ मिळवून दिला.गरजुनी अनेकदा त्या कार्यालयात फेऱ्या मारुनही दाद दिली जात नाही त्यातच शासकिय वस्रोद्योग प्रशिक्षण घेतलेलेही वंचितानी सरळ बेळगाव जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती अध्यक्ष सुजित मुळगूंद यांच्या निदर्शनास ही बाब करून दिली होती या नंतर वंचिताना घेऊन भाजप नेते पांडूरंग धोत्रे, शेतकरी नेते राजू मरवे यांच्या समवेत उद्यमबाग कार्यालयातील मुख्य अधिकारी वासुदेव दोडमनी यांची भेट घेतली . भ्रष्टाचार करणार्यांना खडे बोलून ताळ्यावर आणून खऱ्या लाभार्थी पर्यंत योजनां पोहोचवून सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार प्राप्त करुन द्या अशी मागणी करण्यात आली या सोबत जे कोण दबाव आणत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असे सुनावल्यावर जे अर्ज करुन वंचित आहेत ते तपासून लाभार्थ्यानां नक्कीच लाभ मिळवून देत जे आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन अधिकाऱ्यानी दिल
यावेळी अर्ज करुनही योजनेपासून वंचित असलेले अनेक विनकाम कामगार सागर कलबुर्गी,वेकंटेश कांबळे,परशराम लोकरी,तानाजी हालगेकर,रमण मरवे,चेतन रेडेकर,परशराम कांबळे,गिरीश मोरकर,नागेश रेडेकर,उत्तम होसूरकर,बसवंत पाटील,चेतन पाटील,शिवाजी होसूरकर,मंगेश होसूरकर सह अनेक जन उपस्थित होते.
बातमी लेखन-राजू मरवे